पाटणा – राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य आहेत आणि त्यांना संधी मिळाली तर ते पंतप्रधान होऊ शकतात, असे वक्तव्य बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. जनतेने जर काँग्रेसला संधी दिली तर राहुल गांधी पंतप्रधान बनतील, यात काहीच चुकीचे नाही. मी राहुल यांना पंतप्रधानपदासाठी समर्थन देईन आणि त्याच्यामध्ये कोणतीही अडचण नाही, असे यादव म्हणाले.
सगळे नेते पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत. मला वैयक्तिकरित्या राहुल यांच्या नावावर कोणताही आक्षेप नाही. सगळे विरोधक एकत्र आहेत. आमच्या एकीमुळे भाजप नेतृत्वाविषयी प्रश्न करत आहेत, असेही ते म्हणाले. सार्वजनिरित्या पहिल्यांदाच तेजस्वींनी राहुल गांधींना समर्थन दिले आहे.