राहुल गांधी यांनी आपल्या प्रचारसभेत तेच तेच मुद्दे पुन्हा उपस्थित केले; त्या मुळे कॉंग्रेसचा पराभव

0

नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवाला नेमके कोण जबाबदार आहे? याचे मंथन होईल तेव्हा होईल. कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे कि, राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान आपल्या भाषणात तेच तेच मुद्दे सांगितले जे लोकांच्या पसंतीस उतरले नाही. तसेच पुलवामा येथील दहशतवादि हल्ल्यानंतर भारताने केलेल्या प्रत्युत्तर दाखल केलेल्या हल्ल्याचा फायदा पण मोदींना निवडणुकीत झाला. सॅम पित्रोदा यांनी २६/११ बाबत चूकीचे वक्तव्य केले होते, तसेच १९८४ बातीत जे वक्तव्य होते त्याचा परीणाम आम्हाला या निवडणुकीत भोगावा लागला हे असे त्यांनी सांगितले आहे.

सलग २०१४ नंतर कॉंग्रेस पक्षाचा सगळ्यात मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला मोठी नामुष्की सहन करावी लागत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राहुल यांनी आपल्या प्रचारादरम्यान चौकीदार चोर है अशा प्रकारच्या घोषणा देत राफेल मुद्द्यावरून मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा काही फायदा झाला नाही, असे त्यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

दरम्यान कॉंग्रेस पक्षाचा पराभव नेमका कशामुळे झाला? कॉंग्रेस कुठल्या ठिकाणी चुकला? हे शोधण्यासाठी आज शनिवार रोजी  होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याचे उत्तर  शोधणार आहोत असंही या सगळ्यांनी म्हटले आहे. या बैठकीला राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते हजर राहणार आहे.