राहुल गांधींनी राजीनामा मागे घ्यावा; कार्यकर्त्याकडून आत्महत्येचा प्रयत्न

0

नवी दिल्ली: लोकसभेतील पराभव जिव्हारी लागल्याने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. अद्याप हा राजीनामा स्वीकारला गेला नसला तरी राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम आहे. दरम्यान आज कॉंग्रेस कार्यालयासमोर राहुल गांधींच्या एका समर्थकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी त्याने केली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.