मोदींना मिळालेल्या पुरस्कारावरून राहुल गांधी, स्मृती इराणी यांच्यात ट्वीटर वॉर !

0

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘फिलिप कोटलर प्रेसिडेंशियल अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. यावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे. ‘मी पंतप्रधान मोदी यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो, हा पुरस्कार खूप प्रसिद्ध आहे ज्याचा कोणीही ज्युरी नाही’ असा टोला राहुल गांधींनी लगावला होता. यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे.

ज्या गांधी परिवाराने स्वत:च्या कुटुंबातील सदस्याला भारतरत्न पुरस्कार दिले त्या कुटुंबातील व्यक्तीकडून असे आरोप केले जात असल्याचे स्मृती इराणी यांनी ट्वीट करत राहुल गांधीची विकेट घेतली आहे.