सोलान: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये जी नोट बंदी केली होती, त्यावेळी सगळ्या मंत्री मंडळाला ७ रेस कोर्स रोड येथे बंद केले होते असा नवीन आरोप आज राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर केला आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशाला अर्थव्यवस्थेला नवा मार्ग दाखवला असून आरबीआयकडे देशाच्या अर्थव्यवस्थेची सगळी माहिती असून मोदींनी त्यांना न विचारता नोटबंदी केली असा टोला त्यांनी हिमाचल प्रदेशातील सोलान येथील प्रचार सभेत लगावला.
मोदी ज्यांना ज्ञान आहे त्याचं न ऐकता, ते स्वत:च्या जगात वावरत असतात, असे ते म्हणाले. माझ्या सुरक्षेची जबाबदारी विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्याकडे असून त्यांनीच मला या विषयी माहिती दिली असल्याचा निर्वाळा राहुल गांधी यांनी यावेळी केला. तसेच त्यांनी भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांची स्तुती करत त्यान कामाचा अनुभव असल्याचे म्हटले आहे.
या दरम्यान त्यांनी सर्जिकल स्ट्राइकसंबंधी मोदींनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी मोदी इतके ज्ञानी आहेत की, ते हवाई दलाच्या लोकांना सांगतात की घाबरू नका, ढगाळ वातावरणामुळे आपल्याला फायदा होईल, असाही टोला त्यांनी लगावला.