नवी दिल्ली: १७ व्या लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. मात्र राहुल गांधी राजीनामा देण्यावर ठाम असून नवीन पर्याय शोधण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव नाकारण्यात आला. कॉंग्रेसमध्ये अनेक नेत्यांना राहुल गांधी अध्यक्ष हायस वाटत आहे. परंतु, राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहे. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी राहुल पक्षाला वेळ देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या निर्णयात युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहिण प्रियंका गांधी त्यांच्यासोबत आहेत.
दुसरीकडे राहुल गांधी सध्या कुणालाही भेटत नसल्याचे समजते. विजयी खासदारांनी राहुल यांच्याशी संपर्क केला. परंतु, राहुल यांनी भेटण्यास नकार दिला. त्यानंतर राहुल यांच्या सर्व बैठका आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. सोमवारी राहुल यांनी काँग्रेसचे दोन वरिष्ठ नेते केसी वेनुगोपाल आणि अहमद पटेल यांच्याशी चर्चा केली. यावेळी राहुल यांनी दोन्ही नेत्यांना अध्यक्षपदासाठी पर्याय शोधण्याच्या सूचना दिल्याचे सुत्रांनी सांगितले.