नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अद्याप हा राजीनामा मंजूर झालेला नाही. राहुल गांधीनी राजीनामा मागे घेऊन पक्षाचे नेतृत्त्व करावे असे कॉंग्रेस नेत्यांनी वारंवार त्यांना विनवणी केली आहे. दरम्यान आता पुन्हा पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही.नारायणस्वामी हे राहुल गांधी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या भेटीला गेले आहे.