राहुल गांधी यांचे मोदी यांना फक्त पाच मिनिट बोलण्याचे आव्हान!

0

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी अधिकच वाढली आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना 15 मिनिटे न वाचता भाषण करण्याची आणि पाच वेळा विश्वेश्वरय्या बोलण्याचे आव्हान दिले होते. पण आता काँग्रेस अध्यक्षांनीही पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला असून ज्यात काही मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींना पाच मिनिटे बोलण्याचं आव्हान दिले आहे. “प्रिय मोदीजी तुम्ही जास्त बोलता, पण तुमची कामं आणि शब्दांचा ताळमेळ नसतो,” असं राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडीओत लिहिलं आहे.

राहुल गांधींनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे, कर्नाटकमध्ये भाजपकडून आरोप असलेल्या नेत्यांना उमेदवारी दिल्याने पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी पंतप्रधानांना विचारलं आहे की, “रेड्डी बंधू टोळीला 8 तिकीटं देण्याबाबत पाच मिनिटं बोलणार का?” याचप्रकारे येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवल्याप्रकरणीही प्रश्न उपस्थित केले आहेत. 23 खटले असूनही येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवल्याबाबत पंतप्रधान बोलणार का? अशाच प्रकारे भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या कर्नाटक भाजपच्या टॉप 11 नेत्यांचाही उल्लेख व्हिडीओमध्ये केला आहे.