अमित शहांबद्दलच्या विधानावरून निवडणूक आयोगाची राहुल गांधींना क्लीनचीट

0

नवी दिल्ली: सध्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर चिकलफेक करत आहे. दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना खून प्रकरणातले आरोपी असल्याचे सांगत भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यावरून टीका केली होती. या विधानावरून राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. या विधानावरून निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना क्लीन चिट दिली आहे. मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये 23 एप्रिल रोजी झालेल्या सभेत राहुल यांनी शहांना खून प्रकरणातले आरोपी म्हटले होते. राहुल गांधींच्या विधानामुळे आचारसंहितेचा भंग झाले नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

खून प्रकरणातले आरोपी भाजपा अध्यक्ष अमित शहा. वाह, काय शान आहे, असे राहुल गांधी जबलपूरमधल्या एका जनसभेला संबोधित करताना म्हणाले होते. राहुल यांच्या विधानाला भाजपाने आक्षेप घेतला. यानंतर भाजपाकडून या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. राहुल गांधींच्या भाषणाचा तपशील निवडणूक आयोगाने जबलपूरच्या डीईओंकडून मागवण्यात आला. या भाषणाची आयोगाने पडताळणी केली. मात्र त्यात आचारसंहितेचा भंग झाल्याचे आढळून आले नाही.