मणिपूरमधील १२ आमदारांकडून राहुल गांधींचे अनुकरण; दिले राजीनामे

0

मणिपूर: लोकसभेच्या निकालात कॉंग्रेसला सपाटून मार खावा लागला, त्यानंतर झालेल्या चिंतन बैठकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला राजीनामा दिला असून ते राजीनाम्यावर ठाम आहे. लोकसभा निकालात पराभवाला जबाबदार धरत कॉंग्रेसच्या अनेक प्रदेश अध्यक्षांनी आपला राजीनामा सादर केला आहे. आता मणिपूरमधील चक्क १२ आमदारांनी आपला राजीनामा सादर केला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे सोपवत आम्ही राहुल गांधी यांचे अनुकरण करत आहोत असे म्हटले आहे.

कॉंग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत फक्त ५२ जागांवर समाधान मानावे लागले आहे.पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्याच धर्तीवर मणिपूर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गैखंगम यांना पक्षाच्या १२ आमदारांनी राजीनामे सोपवले आहेत. राजीनामा दिलेल्या आमदारांनी म्हटले आहे की आम्हाला कॉंग्रेस पक्षाची काही अडचण नसून, आम्ही राहुक्ल गांधी यांचे अनुकरण करत आहोत. मणिपूर मध्ये लोकसभेच्या दोन जागा असून त्या जागांवर कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मणिपूर कॉंग्रेस चे अध्यक्ष गैखंगम यांनी सांगितले की, माझ्याकडे काही सहकाऱ्यांनी राजीनामे सोपवले आहेत, मात्र मी अजुनही कोणत्याही पत्रकावर स्वाक्षरी केलेली नाही. राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाला बळकटी मिळण्यासाठी आपला राजीनामा दिला आहे. त्या मुळे मणिपूर मधील आमदारांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा सादर केला आहे. राजीनाम्याबात कार्यकारिणी समिती निर्णय घेईल असे त्यांनी सांगितले आहे.