नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लग्न कधी करणार? हा विषय राष्ट्रीय प्रश्न असल्याप्रमाणे चर्चीला जातो. दरम्यान रायबरेलीच्या काँग्रेस आमदारासोबत राहुल गांधी लग्न करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. राहुल गांधींशी लग्न करणार का? हा प्रश्न आमदार अदिती सिंग यांना विचारण्यात आले त्यामुळे त्या चांगल्याच संतापल्या. राहुल गांधींसोबत लग्न ठरल्याच्या अफवांचं आमदार अदिती सिंग यांनी खंडन केले आहे.
‘अफवा ऐकून मी नाराज आहे. राहुल गांधी माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे आहेत. मी त्यांना सन्मानाने राखी बांधते. आमच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चुकीच्या अफवा पसरविल्या जात आहेत.
‘कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वाचे लक्ष विचलित करण्याचा हा डाव आहे. या अफवांमागे कोण असू शकतं, हे तुम्ही ओळखू शकता’ असं सांगत अदिती सिंग यांनी विरोधकांकडे अंगुलीनिर्देश केला.
राहुल गांधी, अदिती आणि त्यांच्या कुटुंबाचा एकत्रित फोटो शनिवारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘राहुल गांधींना अखेर सुयोग्य जोडीदार मिळाला. सोनिया गांधी पुढील बोलणी करत आहेत’ अशा आशयाचं कॅप्शन फोटोला जोडण्यात आलं होतं. त्यानंतर अदिती यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली होती. ‘अफवा पसरवणाऱ्यांनी सावध राहा’ असा इशारा त्यांनी दिला.
मैं कल से बहुत अधिक परेशान हूँ, सोशल मीडिया पर मेरी और @RahulGandhi जी की शादी को लेकर लगातार झूठ फैलाया जा रहा है।
राहुल गांधी जी मेरे राखी वाले भाई हैं।
यह अफवाह मात्र है।
अफवाह फैलाने वाले बाज आएं।
????https://t.co/oRN3VI8ESR— Aditi Singh (@AditiSinghINC) May 6, 2018