नवी दिल्ली:राफेल प्रकरणात दुबार सुनावणी करण्याचे आदेशावर कोर्टाने दिले आहे, त्यामुळे ‘चौकीदार चोर आहे हे कोर्टानेही मान्य केले आहे असे वक्तव्य कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. हे वक्तव्य राहुल गांधी यांना भोवले आहे. राहुल गांधींनी चुकीच्या पद्धतीने राफेल आणि मोदींचे संबंध जोडल्याचे म्हणत कोर्टाने त्यांना अवमान नोटीस बजावली आहे.
भाजप नेत्या मिनाक्षी लेखी यांनी दाखल केलेली मानहानी याचिका रद्द करण्यात यावी, अशी विनंती राहुल गांधी यांनी कोर्टाकडे केली होती. मात्र, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ती फेटाळून लावली. मीनाक्षी लेखींद्वारे राहुल यांच्याविरोधात दाखल मानहानी याचिका आणि राफेल प्रकरणी निकालाविरोधात दाखल फेरविचार याचिकेवर ३० एप्रिलला एकत्रित सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाला सांगितले.