नवी दिल्ली-कोरियात सुरु असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पीयनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी पदकांची लयलूट सुरुच ठेवली आहे. १० मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात भारताच्या ह्रदय हजारिकाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर सांघिक प्रकारातही भारतीय महिलांनी सुवर्णपदकाची कमाई करत भारताच्या खात्यात आणखी एक पदकाची भर टाकली आहे.
पात्रता फेरीत भारताकडून ह्रदयने अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केले होते. अंतिम फेरीत शेवटच्या संधीत गुणांची बरोबरी झाल्यानंतर शूटऑफमध्ये ह्रदयने सुवर्णपदक निश्चित केले.
महिलांमध्ये एलवेनिल वाल्वारियन, श्रेया अग्रवाल, मनिनी कौशिक यांनी धडाकेबाज कामगिरी करत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली. मात्र ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या पुरुष संघाने निराशाजनक कामगिरी केली.