रेल्वेतील स्वयंपाक घरात सीसीटीव्ही बसविले जाणार-रेल्वेमंत्री

0

नवी दिल्ली- रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आयआरसीटीसीच्या स्वयंपाक घरात सीसिटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे सांगितले. स्वयंपाक घरात सीसिटीव्ही कॅमेरे लावल्यास स्वच्छता आणि तयार होणाऱ्या पदार्थांवर लक्ष ठेवले जाणार आहे. रेल्वे विभागाने एक कार्यक्रम हाती घेतले आहे. त्याअंतर्गत मार्च २०१९ पर्यंत सर्व रेल्वे गाड्यांमध्ये बॉयो टॉयलेट बसविले जाणार आहे. बॉयो टॉयलेट सुरु झाल्यानंतर प्रवाश्यांनी यात कचरा टाकू नये असे आवाहन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. तसेच प्रत्येक झोनमध्ये अतिरिक्त कोच लावण्यात येणार आहे. त्यामुळे एखादी रेल्वे गाडी उशीर झाल्यास त्या कोचचा वापर प्रवाश्यांना करता येईल.