BREAKING: रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर !

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मोठे गिफ्ट दिले आहे. दिवाळीनिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा करण्यात आली आहे. ७८ दिवसांच्या वेतनाइतका बोनस दिला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ११ लाख कर्माचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. सलग सहाव्या वर्षी पहिल्यांदाच रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती देताना सांगितले.

या महत्वाच्या निर्णयाबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळाने ई-सिगारेटवरही बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या नियमाचे उल्लंघन झाले तर त्यासाठी कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच जर हा गुन्हा घडला असेल तर त्यासाठी १ वर्षाचा तुरुंगवास किंवा १ लाख रुपयांचा दंड किंवा दोन्ही होऊ शकते. तसेच वारंवार जर या नियमाचे उल्लंघन झाले तर तीन वर्षांचा तुरुंगवास आणि ५ लाखांचा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा असेल अशी माहिती असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांनी दिली.