रेल्वे कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

0

मुंबई – आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेल्वे कर्मचारी सोमवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एनआरएमयू)तर्फे हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या संघटनेतर्फे सीएसएमटी येथील डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. यात संघटनेचे अध्यक्ष नितीन प्रधान, सरचिटणीस वेणू नायर आणि इतर पदाधिकारी सहभागी होतील. तसेच ८, ९ व १० मे रोजी साखळी उपोषण करण्यात येईल. सीएसएमटी, ठाणे, कुर्ला, दादर, कल्याण, इगतपुरी, लोणावळा यासह विविध प्रमुख स्थानकांवर हे उपोषण करण्यात येईल, अशी माहिती प्रधान यांनी दिली.