कार्डिफ: आयसीसी वर्ल्ड कपस्पर्धेच्या सहाव्या दिवसी श्रीलंका आणि अफगाणिस्तान या दोन संघांमध्ये सोफिया गार्डन्स, कार्डिफ येथे सामना खेळला जातो आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकन संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. या संघाने 33 षटकांमध्ये गडी गमवीत 182 धावा केल्या आहेत, श्रीलंकेची अशी खराब अवस्था असतांना पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या मदतीला वरुणराजा धावून आला असेच म्हणावे लागेल. पावसामुळे 5.30 वाजेपासून खेळ थांबविण्यात आला आहे. सामना 41 षटकाचा करण्यात आला आहे.