अलिकडे व्यंगचित्रे काढत नाही, ती भाषणातून बाहेर पडतात राज ठाकरे
पुण्याच्या कार्यक्रमात राज यांनी रेखाटले अजित पवारांचे व्यंगचित्रे
पुणे
जागतिक व्यंगचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव २०२३ चे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज ठाकरे यांनी सर्व व्यंगचित्र पाहून कलाकार मंडळींचे कौतुक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यंगचित्र काढण्याचा आग्रह केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं व्यंगचित्रही काढलं, उद्घाटनाला कार्टुन्सट कम्बाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यातही व्यंगचित्रकार दडलेला आहे. गेले काही वर्षे त्यांनी त्यांची व्यंगचित्र प्रसिद्ध केली नसली तरीही त्याआधी अनेकांनी त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहेत. मला सोशल मीडियावर व्यंगचित्र शेअर करायला आवडत नाहीत, असेही त्यांनी एका कार्यक्रमात जाहिररित्या सांगितले होतं आज पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी वेळ आणि बैठक मिळत नसल्याने व्यंगचित्र काढत नसल्याची खंत बोलून दाखवली. मी व्यंगचित्र पाहत होतो, फार अप्रतिम व्यंगचित्र आहेत. हे व्यंगचित्र पाहताना आणि नेहमीच माझा हात रोज शिवशिवतो. बऱ्याचदा माझ्या भाषणातून व्यंगचित्र बाहेर पडतात, असे राज ठाकरे म्हणाले. मला एका कार्यक्रमात प्रश्न विचारला राजकारण, की व्यंगचित्र. तेव्हा मी व्यंगचित्र असे सांगितले. कारण मी व्यंगचित्रात, कलेत रमणारा माणूस आहे.
टोलवरून मिश्किल टिप्पणी
माझी रत्नागिरीत उद्या सभा आहे. मी जाणार होतो पुण्यातून, पण मध्येच टोल भरावा लागला, अशी मिश्किल टिप्पणीही राज ठाकरे यांनी यावेळी केली.