बिग ब्रेकिंग ! जळगावच्या खटल्यात राज ठाकरें निर्दोष


Raj Thackeray nirdosh in Jalgaon case । उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी 2008 मध्ये रत्नागिरीतल्या खेडमध्ये राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ जळगावात मनसे पदाधिकार्‍यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात आज राज ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर, अ‍ॅड. जमील देशपांडे, रज्जाक सय्यद यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी 21 ऑक्टोबर 2008 मध्ये कल्याण खेरवाडी राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ जळगावात मनसे पदाधिकार्‍यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रमुख आरोपी होते तर प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर, अ‍ॅड. जमील देशपांडे, रज्जाक सय्यद यांचाही आरोपी म्हणून समावेश होता. दरम्यान 2014 मध्ये राज ठाकरे यांना या खटल्यात जामीन मंजूर करण्यात आला होता. तसेच सुनावणीसाठी अनुपस्थीत राहण्याबाबत सुट देण्यात आली होती. आज जिल्हा सत्र न्यायालयात न्या. जोशी यांच्या न्यायालयात कामकाज झाले. सुनावणीअंती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर, अ‍ॅड. जमील देशपांडे आणि रज्जाक सय्यद यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.