उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत राज ठाकरे यांची धूम

लखनव – संपूर्ण भारतात ज्या निवडणुकीची चर्चा आहे ती म्हणजे उत्तर प्रदेश राज्याच्या विधानसभेची मात्र या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चर्चा आहे. कारण  २०१४ साली मोदींच्या बाजूने आणि २०१९ ला मोदींच्या विरोधात राज यांनी इतक्या तोफा चालवल्या आहेत की, त्याचा धूर सोशल मीडियावर अजून दिसत राहतो. सध्या उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांची चर्चच यामुळेच सुरु आहे.

 

झाले अस आहे कि कोरोनामुळे प्रत्यक्ष प्रचाराला मर्यादा आहेत. मात्र सोशल मीडियावरून जोरात प्रचार सुरु आहे. अश्या वेळेस राज यांचे जुने व्हिडियो उत्तर प्रदेशात धूम करत आहेत.