मुंबई: २०१९ लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या सभेमधून मोदी, शहा या जोडीवर टीका करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज झालेल्या भाजपाच्या विजयावर ट्वीट केले असून त्यांनी आपल्या ट्वीटर वर ‘अनाकलनीय’ या शब्दात आपले मत मांडले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस साठी सभा घेतल्या त्या ठिकाणी सुद्धा ते उमेदवार निवडून आले नाही. २०१९च्या लोकसभा निवडनुकीचा निकाल हा अनाकलनीय आहे असे म्हटले आहे. ‘लाव रे तो व्हिडीओ’ असे म्हणत राज यांनी मोठ्या प्रमाणात पंतप्रधान मोदींची खील्लि उडवली होती. राज ठाकरे यांच्या सभांचा फारसा परिणाम झाला नसल्याचे या निकालातून सिद्ध झाले आहे.
पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना राजकीय क्षितिजावरुन हटवा असे आवाहन राज यांनी आपल्या सभेमधून केले होते. त्यासाठी त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी प्रचार सभा देखील घेतल्या होत्या. ज्या मतदारसंघामध्ये राज यांच्या सभा झाल्या त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात युतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे पाहण्यात मिळाले आहे.