एक लाख एसटी कर्मचारी अंगावर आले तर तुम्ही काय कराल?

राज ठाकरे यांचा सरकारला सवाल

 Raj Thakre on ST strike – सरकार ज्या प्रकारची वागणूक एसटी कर्मचाऱ्यांना देत आहे ती अत्यंत चुकीची असून अशी वागणूक कर्मचाऱ्यांना देणे योग्य आहे. एकीकडे तुम्ही कर्मचाऱ्यांचे चार चार महिने पगार थांबवता तर दुसरीकडे त्यांना अत्यंत हीन वागणूक देतात अशा वेळेस जर हे एसटी कर्मचारी एकत्र आले आणि तुमच्या अंगावर आले तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

 

मनसे पक्षाची बांधणी करण्यासाठी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक महानगरपालिका येउ घातल्यामुळे पक्षबांधणीसाठी राज ठाकरे नाशिकला आले असता त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, एसटी वर तोडगा हा निघालाच पाहिजे कारण 1960 पासून आतापर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक का गावाला जोडणारी ही वाहतूक आहे. एसट नफरत कसे जाईल हे बघण्यासाठी सरकारला पुढे येणे गरजेचे आहे.

मात्र असे काही होत नसून एसटी कर्मचाऱ्यांना हीन वागणूक मिळत आहे. जय एसटी कर्मचाऱ्यांचे चार चार महिने हे सरकार पगार देत नाही त्यात सरकारच्या मंत्र्यांना समजा त्यांचा काळा पैसा मिळाला नाही तर त्यांना ते चालेल का? असा प्रश्नही यावेळी राज ठाकरे यांनी विचारला.