राजेंद्र गावित यांचे भाजपात प्रवेश

0

मुंबई-पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेतर्फे वनगा यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान कॉंग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश केला असून त्यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. कॉंग्रेसकडून दामू शिंगडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राजेंद्र गावित हे कॉंग्रेसमध्येच असून ते माझ्या संपर्कात असल्याचे काही वेळापूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले होते. मात्र काही तासानंतर गावित यांनी भाजपात प्रवेश केला.