दिल्लीत राजीव गांधी ‘मॉब लिचिंग’चे प्रणेते असल्याचे फलक !

0

नवी दिल्ली-दिल्लीत १९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेसचा सक्रीय सहभाग होता असा आरोप केला जातो. दरम्यान या दंगलीशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये केला होता. याच मुद्द्यावरून दिल्लीत अनेक ठिकाणी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’ (जमावाकडून होणारी हत्या) असा आशय असलेले होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. भाजपाचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी हे होर्डिंग्ज लावले आहेत. या होर्डिंग्जमुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. फलकांवर प्रकाशक तेजिंदरपालसिंग बग्गा असे नाव आहे. मागील आठवड्यात राजीव गांधी यांच्या जयंतीदिवशीही बग्गा यांनी राजीव गांधी हे मॉब लिचिंगचे जनक असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी यावरून मोठा वाद झाला होता. माजी पंतप्रधानांचा अवमान केल्याप्रकरणी बग्गा यांच्याविरोधात काँग्रेसने दिल्ली पोलिसांत तक्रारही केली होती.