राजनाथ सिंह यांनी सरकारी बंगला सोडला

0

लखनऊ : सुप्रीम कोर्टाने माजी मुख्‍यमंत्र्यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश दिले आहेत. यांचे सर्वात आधी पालन केले आहे ते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी. ते लखनऊच्या कालीदास मार्गावरील सरकारी बंगला खाली करणार आहेत. मुख्यमंत्री असतांना त्यांना हे निवासस्थान देण्यात आले होते. सरकारी बंगला खाली करुन ते गोमती नगर येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी जाणार होणार आहेत.

२००० ते २००२ काळात होते मुख्यमंत्री 

गृहमंत्री राजनाथ सिंह २००० ते २००२ पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. २०१४ मध्ये लखनऊमधून खासदार झाल्यानंतर आणि गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी लखनऊ दौऱ्यात याच बगल्याचा राहण्यासाठी वापर केला. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आणि उत्‍तर प्रदेश सरकारने देखील माजी मुख्यमंत्र्यांनी बंगले खाली करण्यासाठी सांगितले आहेत. १५ दिवसात त्यांना बंगले खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे.