सर्वाधिक दारू राजपूत आणि यादवच पितात

0

लखनौ :- उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या निवासस्थानावर शनिवारी आंदोलकांनी टोमॅटो आणि अंडी फेकून मारली. ओम राजभर यांनी राजपूत आणि यादव जास्त दारु पितात असे वादग्रस्त विधान केल्याने समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते आज दुपारी राजभर यांच्या हजरतगंज येथील अधिकृत निवासस्थानी धडकले.

शुक्रवारी राजभर यांनी वाराणसीमध्ये दारू पिण्याच्या सवयीवर वक्तव्य केले होते. राजभर समाजाच्या लोकांना दारू पिण्याच्या बाबतीत दोष दिला जातो. परंतू सर्वाधिक दारू राजपूत आणि यादवच पितात, असे विधान ओम प्रकाश राजभर यांनी केले होते. राजभर यांनी स्वत:च्याही तसेच अन्य जातीचे लोकही दारु पितात, असेही ते म्हणाले होते. दारु पिऊन आल्यावर काय त्रास होतो हे तुम्हाला आई, बहिण किंवा पत्नीच सांगू शकते असे राजभर म्हणाले होते. ओम प्रकाश राजभर हे भाजपाचा सहकारी पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय पार्टीच्या कोटयातून मंत्री झाले आहेत. याआधी योगी आदित्यनाथ सरकारच्या कामगिरीवरुनही त्यांनी वाद निर्माण केला आहे. राज्यातील भाजपा सरकारने एकही चांगलं काम केलेलं नाही. काँग्रेस सरकारला कंटाळून जनतेने ज्याप्रकारे पर्याय म्हणून मोदींना निवडलं, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमधील जनता पर्याय शोधेल असं ओम प्रकाश राजभर म्हणाले.