खडसे महाविद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती संपन्न

मुक्ताईनगर प्रतिनिधी….. येथील खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती संपन्न करण्यात आली, तसेच या प्रसंगी सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी प्रा. डॉ. साळवे यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी लोकशाहीवादीची आणि सामाजिक सुधारण्याची सुरुवात करून जन सामान्यांसाठी शिक्षण प्रसाराची, आरक्षणाची, जातिभेद निर्मूलनाची व स्त्री शिक्षणाचे बीजारोपण केले. त्यामुळे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो असे उद्बोधन केले. तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा देशातील प्रत्येक नागरिकांनी बाळगून देशभरात न्याय, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षता प्रस्थापित केली पाहिजे असे आवाहन केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन, उपप्राचार्य अनिल पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दीपक बावस्कर, प्रा. डॉ. ताहिरा मीर, प्रा. डॉ. प्रतिभा ढाके व ग्रंथालयाचे अधीक्षक प्रा. सरोदे यांनी केले.

या कार्यक्रमालासाठी प्रा. डॉ. येवले, प्रा.डॉ. अतुल बढे, प्रा.श्रावगे, प्रा. विजेंद्र पाटील प्रा डॉ गायकवाड व राजू जुमळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय डांगे यांनी तर तसेच आभार प्रदर्शन प्रा.डॉ. येवले यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.