जयपूर-राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीने रण तप्त झाले आहे. भाजप-कॉंग्रेसमध्ये याठिकाणी प्रमुख लढत आहे. आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नागौर येथे प्रचारसभा घेत कॉंग्रेसवर निशाना साधला. अमित शहा यांनी कॉंग्रेसला ना देशाची ना राजस्थानची चिंता असे सांगत आरोप केले. कॉंग्रेस पक्ष आता गांधी-परिवाराची प्रायवेट फर्म बनली आहे असे आरोप भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले.
याप्रचार सभेत अमित शहा यांनी केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती दिली. अमित शहा यांनी मोदी सरकारने संपूर्ण देशात राबविलेल्या १२९ योजनांची माहिती दिली. मोदींच्या राज्यात देशात सुरक्षेचे वातावरण आहे. मोदी सरकारने आघाडी सरकारपेक्षा अडीचपट अधिक निधी दिला असे सांगितले. अमित शहा यांनी एनआरसीच्या मुद्द्यावर कॉंग्रेसवर आरोप केले.