जयपूर- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे.
राजस्थानमध्ये १९९ जागांसाठी २२७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय विविध निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनीही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचे अंदाज आहेत. मात्र, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी विशेष रणनीती आखून प्रचारात घेतलेली आघाडी सर्वेक्षणांचे आकडे व सत्ताबदलाची परंपरा मोडीत काढते का? याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.
तेलंगणामध्ये ११९ जागांसाठी मतदान होत आहे. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीसमोर काँग्रेसचे आव्हान आहे. येथे ३२ हजार ७१५ केंद्रांवर मतदान होत आहे. अंदाजे तीन कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. मतमोजणी ११ डिसेंबरला होणार आहे.