मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी केले मतदान

0

जयपुर। आज राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान थोड्यावेळापूर्वी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल, केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी त्यांचे पुत्र खासदार दुष्यंत आणि सून निहारिका सिंह यांच्यासोबत झालावाड येथे मतदान केले.