राजस्थान निवडणूक: दुपारी १ वाजेपर्यंत ४१.५३ टक्के मतदान !

0

जयपुर: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. १९९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सकाळपासून मतदान सुरु आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ४१.५३ टक्के मतदान झाले आहे. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून त्यामुळेच दुपारपर्यंत इतक्या प्रमाणात मतदान झाले आहे.

काही ठिकाणी मतदानयंत्रात बिघाड झाले होते. एका केंद्रीय मंत्र्याला देखील मतदानयंत्र खराब झाल्यामुळे रांगेत उभे राहावे लागले.