जयपूर- देशभरातील पाच राज्यात निवडणुका होत आहे. राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. प्रत्यके पक्ष तरुण व महिलांना उमेदवारी देण्यात स्वत:ला अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. राजस्थानमध्ये दोनशे जागांसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान कॉंग्रेसने २७ तर भाजपने २३ महिलांना उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसने महिलांना दिलेल्या उमेदवारीत मुस्लिम समुदायातील ३ महिलांचा समावेश आहे. तर भाजपने एकही मुस्लिम महिलेला उमेदवारी दिलेली नाही.
२०१५ च्या निवडणुकीचा विचार करता कॉंग्रेसने यावेळी अधिक महिलांना संधी दिली आहे. २०१५ मध्ये कॉंग्रेसने २३ महिलांना उमेदवारी दिली होती. भाजपने २५ महिलांना उमेदवारी दिली होती. यावेळी भाजपने २ महिला उमेदवार कमी केले आहे. सध्या एकूण २८ महिला आमदार आहेत.
कॉंग्रेसकडून उदयपूरमधून गिरीजा व्यास, कामां येथून जाहिदा खान, मालवीयनगर येथून अर्चना शर्मा, रायसिंहनगरहून सोनादेवी बावरी, संगरियाहून शबनम गोदारा, सादुलपुरहून कृष्णा पूनिया, बगरूहून गंगादेवी, बामनवास येथून इंदिरा मीणा आणि ओसियांहून दिव्या मदेरणा यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने बीकानेर पूर्व येथून सिद्धि कुमारी, कोलायतमधून पूनम कंवर, नदबईमधून कृष्णेंद्र कौर, सपोटरामधून गोलमा देवी, अजमेर दक्षिणहून अनिता भदेल, सूरसागरहून सूर्यकांता व्यास व राजसमंदमधु किरण व्यास यांना उमेदवारी दिली आहे.