राजस्थान निवडणूक: मोदी, शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेते आज ‘रण’मध्ये

0

जयपूर-राजस्थान विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय आखाडा ढवळून निघाला आहे. दररोज प्रचार सभा होत आहे. आज राजस्थानमध्ये भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह तीन राज्यातील मुख्यमंत्री, तीन केंद्रीय मंत्री निवडणूक प्रचारासाठी दाखल होणार आहे. हे सर्व नेते आज राज्यस्थानमध्ये तब्बल दोन डझन सभा घेणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मारवाड येथे जाणार आहे. मोदी कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे गड मानले जाणाऱ्या जोधपुर येथे सभा घेणार आहे.दुपारी १२.३० वाजेनंतर मोदी जोधपुर येथील दशहरा मैदान येथे जनतेला संबोधित करणार आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा सकाळी १०.३० वाजता चित्तौडगड येथील अनगड बावजी येथे, ११.३० वाजता प्रतापगड, १.३० वाजता बूंदी आणि २.३० वाजता माधोपुर येथे सभा घेणार आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अजमेरच्या मसूदा येथे, भीलवाडा येथील आसींद आणि चित्तौडगडच्या छोटी सादड़ी येथे सभा घेणार आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा सभा घेणार आहे.

केन्द्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांची देखील प्रचार सभा होणार आहे.