नवी दिल्ली-कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यात स्पर्धा सुरु होती. त्याला अखेर आज पूर्ण विराम मिळाले आहे. दरम्यान सचिन पायलट उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात असे सांगितले जाते.
सचिन पायलट हे सध्या कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.