कॉंग्रेसची दमदार कामगिरी: राजस्थानमध्ये देखील कर्जमाफी !

0

जयपूर-पाच राज्याच्या निवडणुकीत कॉंग्रेसने सत्ता आल्यास दहा दिवसात कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. कॉंग्रेसने आश्वासनपूर्तीकडे वाटचाल सुरु केली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यात कॉंग्रेसची सत्ता आली असून लागलीच कर्जमाफी करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड पाठोपाठ राजस्थान सरकारने देखील शेतकऱ्यांना २ लाखापर्यंतची कर्जमाफी दिली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली.

मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच कर्जमाफी करण्यात आली होती.