भाजपने आश्वासन पाळली नाही तर सत्ता जाईल-खासदार राजू शेट्टी

0

दिल्ली-स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भावा द्यावा, शेतकऱ्यांचा सातबारा कर्जातून कोरा करण्यात यावा अशी मागणी करणारे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. भाजपाने सत्तेमध्ये येताना शेतकऱ्यांना जी आश्वासने दिलेली होती, ती अद्याप पाळलेली नाहीत, दिलेले आश्वासन पाळावे अन्यथा हेच शेतकरी भाजपला सत्तेतून पायउतार करतील. असा इशा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समिती दिल्लीत संसद भवन येथे १९३ शेतकरी संघटनांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी खासदार शेट्टी यांच्या वतीने देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले होते. शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्यासंदर्भात शेतकरी संघटना तसेच शेट्टी यांच्या हालचाली सुरू होत्या. यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी कृषी मंत्री शरद पवार, खासदार अरविंद सावंत, खासदार शरद यादव, खासदार नरेंद्रकुमार, जयप्रकाश यादव, माजी खासदार दिनेश त्रिवेदी, कृषिमूल्य आयोगचे माजी अध्यक्ष टी हक, दीपेंद्रसिंग हुडा, जयंत चौधरी आदी उपस्थित होते.