राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश नारायणसिंह!

0

नवी दिल्ली-राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक झाली त्यात हरिवंश नारायण सिंह यांची निवड करण्यात आली. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे हरिवंश नारायण आणि विरोधकांनी पाठिंबा दिलेले काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद यांच्यात ही लढत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडीनंतर वेगळ्या शब्दात शुभेच्छा दिल्या. आता सर्व खासदारांवर आता हरीकृपा राहिल असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. दोन्हीकडे हरी होते. मात्र हरिवंश नारायण यांचा विजय झाला याचा मनस्वी आनंद झाला असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

हरिवंश यांनी आपल्या वृत्तपत्रतात संसद कशी चालवावी याचा स्तंभ चालवला होता. त्यामुळे त्यांना संसद कशी चालवायची हे ठाऊक आहे. दशरथ मांझी यांची बातमी शोधून काढणारे ते पत्रकार आहेत. ते राज्यसभेच्या उपसभापतीपदी बसल्याने त्यांच्या अनुभवाचा सगळ्यांनाच फायदा होईल यात शंका नाही असेही मोदी यांनी म्हटले आहे. संसदेत त्यांच्या येण्याने एक प्रगल्भ नेता आपल्या सगळ्यांनाच मिळाला आहे.