जामनेर : रावेर लोकसभा निवडणुकीतील विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचा प्रचाराचा झंझावात कायम असून मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आज रक्षा खडसे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत जामनेर तालुक्यात मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी त्यांचे ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करण्यात आले. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या प्रचारफेरीमुळे वातावरण भाजपमे झाल्याचे चित्र जामनेर मतदारसंघात दिसून आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार रक्षा खडसे या मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा निर्धारही याप्रसंगी मतदारांनी बोलून दाखवला. जामनेर तालुक्यातील वाघारी, टाकळी बु, टाकळी खु, पिंपळगाव गो, सोनाळा, पाळधी, नाचणखेडा, कुर्हाड, म्हसास, लोहारा, कासमपुरा, रोटवद, रोटवद तांडा, मोहाडी, पळसखेडा मि येथे भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांचा प्रचार झाला.
यांची होती उपस्थिती
कृ.उ.बा.स.सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर पाटील, विलास पाटील दिलीप खोडपे सर, राजेंद्र चौधरी, राजधर पांढरे, यशवंत पाटील, अमित देशमुख, तुकाराम निकम, शेखर काळे, पंचायत समिती सभापती वनिता पाटील, गोविंद अग्रवाल, भागवत पाटील, उमेश पाटील, नितीन पाटील, राहुल पाटील, अमर पाटील, डॉक्टर भोंडे तसेच महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.