मोदींना पंतप्रधान करण्यासाठी खा. रक्षा खडसेंना निवडून द्या

0

काँग्रेसची खोटं बोलण्याची संस्कृती : शिवराज सिंह चौहान यांचे आवाहन

नांदुरा – मध्यप्रदेश मध्ये सरकार स्थापन झाल्यावर १० दिवसात कर्जमाफी करु असे आश्वासन दिले. आजपर्यंत कर्जमाफी झालेली नाही. शेतकर्‍यांनो बर्‍हाणपूर मध्ये जाऊन शेतकर्‍यांना विचारा, कर्जमाफी झाली की नाही ? काँग्रेसची खोटं बोलण्याची संस्कृती असल्याची टिका मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. दरम्यान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खा. रक्षा खडसे यांना निवडुन द्या असे आवाहनही त्यांनी केले.
नांदुरा येथे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार खा. रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. याप्रसंगी रक्षाताई म्हणाल्या की यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्यासाठी निर्णायक आहे. आपल्या पक्षाविरुद्ध बहुतेक सर्व पक्ष एकत्र आले आहेत. पंतप्रधानांनी गेल्या पाच वर्षात घेतलेल्या जनहिताच्या निर्णयांमुळे विरोधकांना लढण्यासाठी मुद्दाच राहिलेला नाही.
आणखी पाच वर्षे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर राहिले तर आपले भवितव्य संपेल हे ओळखून सर्व पक्ष एकत्र आले आहेत. विरोधकांच्या सभा मेळावे होत राहतील. त्यातून होणार्‍या टिकेकडे अजिबात लक्ष न देता आम्ही जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. बलशाली आणि समृद्ध भारताची पायाभरणी करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे, यामुळेच आम्ही निवडणुकांना आत्मविश्वासाने समोरे जात आहोत असे प्रतिपादन रक्षाताईंनी केले. यानंतर नांदुरा तालुक्यातील शेंबा बु, टाकरखेड, वडनेर, डिघी, चांदुरबिस्वा या गावांमध्ये प्रचार केला. याप्रसंगी विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष आ. चैनसुख संचेती, जळगाव जामोद विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय कुटे, बुलढाणा जि.प.अध्यक्ष ना.उमाताई तायडे,जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, मोहन शर्मा, नांदुरा नगराध्यक्ष रजनी जवरे, सभापती अर्चना पाटील, संतोष डीवरे, शैलेश वाकोडे, अशांत वानखेडे, संतोष मुंढे, जि.प.सदस्य मधुकर वढोदे, प्रभाकर वानखेडे, योगिता गावंडे, सचिन देशमुख, भगवान बावणे, अशोक कांडेलकर, शैलेश मिरगे, सुधीर मुर्हेकर, भाऊसाहेब सरदार, दहाडसिंग सुरडकर, गणेश भोपळे, गजानन चांभारे, निळकंठ भगत व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.