नवी दिल्ली : दैनंदिन वापरातील वस्तूंचे उत्पादन करणारी पतंजली कंपनीने दिवाळखोरीत निघालेल्या रुचि सोयाच्या मालकीसाठी 4 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. पतजंलीने कर्जात बुडालेल्या रुचि सोया कंपनीच्या मालकीसाठी बोली लावली होती. सोबतच अडाणी विल्मर , इमामी एग्रोटेक आणि गोदरेज एग्रोवेट यांच्या देखील यामध्ये समावेश आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदचा खाद्य तेलच्या रिफाइनिंग आणि पॅकेजिंगसाठी याआधीच रुचि सोया बरोबर करार आहे.
इंदूरच्या रुचि सोया कंपनीवर १२ हजार कोटींचं कर्ज आहे. न्यूट्रेला, महाकोष, सनरिच, रुचि स्टार आणि रुचि गोल्ड हे या कंपनीचे इतर ब्रँड आहेत. पतंजलीने रुचि सोयासाठी ४ हजार कोटींची बोली लावली आहे.