बीड-मी राष्ट्रवादीचा जुना कार्यकर्ता आहे. ३ वर्ष अध्यक्ष म्हणून देखील काम केलेले आहे. १५ वर्षापूर्वी चुकून भाजपच्या वाटेवर गेलो मात्र १४ वर्षाचा वनवास भोगून स्वगृही परतलो आहे असे सांगत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे मानस बंधू रमेश कराड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थित त्यांचा प्रवेश झाला. यावेळी आमदार राणा पाटील, अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण, राहुल मोटे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, बसवराज पाटील आदी उपस्थित होते