आज सर्वत्र ईद उत्साहात; शुभेच्छांचा वर्षाव

0

पुणे-महिनाभर रोजे केल्यानंतर शनिवारी म्हणजेच आज देशभरात रमजान ईद साजरी होते आहे. पहाटेच्या नमाज अदा करण्यापासून रमजान ईदचा उत्साह दिसू लागला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी चंद्र दिसल्याने शाही इमामांनी देशातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दिल्लीतील जामा मशिदीच्या शाही इमामांनी शुक्रवारी चंद्र दर्शन झाल्यावर ईद उल फितर शनिवारी साजरी होणार असल्याची घोषणा केली. आज लहान मुलांना घरातल्या मोठ्या सदस्यांकडून ईदी देण्याचीही प्रथा आहे.

ईदच्या मुहूर्तावर ‘रेस-३’ प्रदर्शित 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमजान ईद असल्याने देशभरातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. बंधुभाव आणि प्रेम वाढीला लागावे यासाठी प्रार्थनाही केली आहे. दरम्यान ईदच्या मुहूर्तावरच अभिनेता सलमान खानचा रेस-३ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सलमान खानच्या चाहत्यांसाठी ही अनोखी ट्रिट मानली जाते आहे.


 

मलालाकडून शुभेच्छा

दरम्यान   मलाला युसुफजाईनेही ट्विट करून सगळ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या सगळ्या बंधू भगिनींना रमजान ईद निमित्त शुभेच्छा असे ट्विट मलालाने केले आहे. तर ब्रिटिश लायब्ररीने बादशहा अकबराचे एक तैलचित्र ट्विट करत त्या काळात ईद कशी साजरी होते हे सांगितले आहे.