जळगाव। मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांच्या जन्मोत्सव मंगळवारी 4 रोजी सर्वत्र साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा विविध मंदिर संस्थानांकडून उत्साहात साजरा करण्यात आला. रामनवमीनिमित्त शहरातील विविध श्रीराम मंदिर आधीपासूनच सजविण्यात आली होती. मोठ्या भक्तिभावाने हिंदु बांधवांतर्फे श्रीरामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीसह इतर मंडळातर्फे मंगळवारी शहरात प्रथमच भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीत हिंदु बांधवानी श्रीराम नामाचा जयघोष केला तर तरुणांईंनी जन्मोत्सवाचा जल्लोष साजरा केला. शहरातील अबाल वृध्द हिंदु बांधवांनी रॅलीत सहभाग घेतला. ढोल-ताशे तसेच विविध वाद्यांसह मिरवणूक काढण्यात आली. जिल्हापेठेतील दक्षीणमुखी हनुमान मंदिरापासून मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत शहरातील लोकप्रतिनिंधीनी ठेका धरला होता.
श्रीराम ग्रुपची भव्य मिरवणूक : आसोदा रोडवरील श्रीराम ग्रुपच्या वतीने श्रीराम जन्मोउत्सव निम्मित भव्य विराट मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शनिपेठ, कांचन नगर, वाल्मिक नगर, जैनाबाद परिसर ,तानाजी मालुसरे नगर , प्रशांत चौक या परिसरातील युवक, नागरिक, महिला सहभागी झाले होते. श्रीरामाच्या जय घोष करीत सारा तरुण वर्ग श्रीराम भक्ती मध्ये तल्लीन झाला होता. ढोल ताशा , ओर्केष्ट्रा , पारंपरिक पथके यावेळी मिरवणुकी मध्ये सहभागी झाले होते. आकर्षक श्रीराम जन्मोउत्सव मिरवणुकीचे मध्ये गणेश मंडळ तसेच दुर्गा मंडळे, हिंदुत्वादी संघटना,संस्था सहभागी झाल्या होत्या. वाल्मिक नगरा पासून मिरवणुकीला सुरुवात झाल्या नंतर एम जी रोड , घाणेकर चौक , फुले मार्केट,टॉवर चौक ,दानाबाजार , सुभाष चौक , सराफ गल्ली , राम मंदिरा जवळ मिरवणुकी चा समारोप करण्यात आला.
विदयार्थ्यांच्या लेझीमने वेधले लक्ष
श्रीराम जन्मोउत्सव मिरवणुकीमध्ये शाळेकरी विद्यार्थ्यांनी लेझमी पथकामध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये पाच वर्षांपासून ते पंधरा वर्षा पर्यतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. लेझीम पथकामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादरीकरण केले. विविध वेषभूषे मध्ये लहान बालकांनी श्रीराम दरबार साकारला होता, आदिवासी बांधवांचे भोंगर्या बाजाराचे नृत्य उपस्थितांना ताल धरण्यास भाग पाडत होते. नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये श्रीराम जन्मोउत्सव मिरवणूकीचे क्षण ठिपण्यात मग्न असताना. प्रत्येक जण व्हिडीओ काढण्यासाठी आपला मोबाईल हातात धरून होत.
ध्वजपुजनाने मिरवणुकीस सुरुवात
शहरातील विविध मंडळातर्फे शहरात प्रथमच श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले. दक्षिणमुखी हनुमान मंदिरात प्रथमतः शहराचे प्रथम नागरिक महापौर नितीन लढ्ढा यांच्याहस्ते हिंदुधर्म ध्वजाचे विधीवत पुजा करण्यात आले. ध्वजपुजनानंतर महाआरती करण्यात आली व मिरवणुकीस सुरुवात झाली. ध्वजपुजनप्रसंगी आमदार सुरेश भोळे, उपमहापौर ललित कोल्हे, नगरसेवक, अनंत जोशी, श्याम सोनवणे, श्रीराम जन्मोत्सव समिती अध्यक्ष किशोर भोसले, गजानन मालपुरे, दादा महाराज जोशी, पुजारी नंदकुमार त्रिपाठी, ललित चौधरी, शरद तायडे, सचिन रानडे, विष्णु भंगाळे, मोहन तिवारी, बंटी नेरपगारे, सुनिल महाजन, अमित भाटीया, कमलाकर बनसोडे आदी उपस्थित होते.
मिरवणुक मार्ग: शहरातील विविध मंडळातर्फे पहिल्यांदाचा भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा पेठेतील गोलाणी मार्केट जवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिरापासून मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणूक दक्षिणमुखी हनुमान मंदिर, चित्रा चौक, दाणाबाजार, सुभाष चौकमार्गे रथचौकापर्यत काढण्यात आली. रथचौकाजवळील राम मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुक समारोप प्रसंगी शहरातील लोकप्रतिनिधी यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.
अयोध्येसाठी स्वाक्षरी
उत्तर प्रदेशातील अयोध्येत भारतातील करोडो हिंदु बांधवाचे श्रध्दास्थान असलेल प्रभू श्रीरामाचे मंदिर व्हावी अशी इच्छा आहे. गेल्या अनेक वर्षापासून हिंदु बांधव याची मागणी करीत आहे. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी हिंदु बांधवांनी अयोध्येत मंदिर व्हावे या मागणीच्या निवेदनावर स्वाक्षरी केली. हजारो हिंदु बांधवांनी यावेळी स्वाक्षरी निवेदनावर स्वाक्षरी केली.
श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गर्दी
पोलीस मुख्यालया शेजारील चिमुकले राम मंदिर तसेच जुने जळगाव मधील श्रीराम मंदिर संस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक जाहीर कीर्तन , श्रीराम स्तुती पठण , अभिषेकाचे, भजने , महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. दिवस भर श्रीरामाच्या दर्शनासाठी भक्तांनी मंदिरा मध्ये गर्दी केली होती.
या मंडळांचा होता सहभाग
शहरात काढण्यात आलेल्या श्रीराम जन्मोत्सव मिरवणुकीत शहरतातील विविध मंडळे सहभागी होते. सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समिती, जुने जळगाव मित्र मंडळ, श्रीराम बहुउद्देशीय मित्र मंडळ, हिंदु जनजागृती समिती, नेहरु चौक मित्र मंडळ, शिवतांडव प्रतिष्ठान, जयश्रीराम गृप, गो-सरंक्षक मंडळ, वारकरी संप्रदाय मंडळ आदींचा यात समावेश होता.
पोलिसांचा बंदोबस्त : श्रीराम मिरवणुकीचे आयोजन शहरातील विविध संस्था धार्मिक मंडळे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. श्रीराम नवमी म्हटले म्हणजे हिंदू बांधवांन साठी उत्सव जल्लोष पूर्ण असतो. यामध्ये जळगाववासी मोठया संख्येने सहभागी झालेले असतात. यामुळे संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात मंदिरात तसेच मिरवणुकांची गर्दी असल्याने खबदारी म्हणून पोलीस दलाच्या वतीने शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुकीस अडथळा नको म्हणून जळगाव वाहतूक शाखेकडून दक्षता घेण्यात आली होती. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने मिरवणुकी मध्ये विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून पाण्याची सोया करण्यात आली होती.