नवी दिल्ली: एनडीटीव्हीचे पत्रकार रविश कुमार यांना आशिया खंडातील नोबल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेस पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील कामासाठी अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. रवीश कुमार यांच्याबरोबर म्यानमारमधील पत्रकार को स्वी वीन, थायलंडच्या अंगखाना नेलापाजीत, फिलिपिन्सच्या रेम्युंडो पुतांजे सायाबयाब आणि दक्षिण कोरियामधील किम जाँग की यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘रवीश कुमार यांची या पुरस्कारासाठी निवड करताना निवड समितीने त्यांच्यातील काही खास गुणांचा गौरव केला आहे. आपल्या कामाप्रती असणारी त्यांची प्रतिबद्धता, उच्च दर्जाची आणि पत्रकारिता करता असणारी नैतिकता, त्यांचे सत्यासोबत उभी राहण्याची हिंमत, सचोटी आणि स्वातंत्र्य भूमिका घेणे हे गुण कौतुकास्पद आहेत. सत्तेला शांतपणे प्रश्न विचारत पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा हा सत्कार आहे’ मॅगसेसेने म्हटले आहे.