मुंबई-रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील घनिष्ठ नातेसंबंधांमुळे ते दोन्ही प्रकाश झोतात आहे. हे दोघे अलीकडेच एका डिनरमध्ये एकत्र दिसले होते. रणबीर आणि आलिया त्यांच्या टीमसोबत होते, त्यात दिग्दर्शक अयन मुखर्जी आणि करण जोहर होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रणबीर कपूर व आलीय एकाच कारमधून प्रवास करीत होते. अयान आणि करण जोहर वेगळ्या कारमध्ये होते. त्याच ठिकाणी जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मीही उपस्थित होते. मुंबई मिरर यांच्या नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अलिया यांनी सांगितले की, रणबीरसोबत काम करणे हे त्यांच्यासाठी एक स्वप्न होते. रणबीरसोबत काम करण्याची माझी नेहमीच इच्छा होती. रणबीर आणि आलियाचा पहिला चित्रपट पुढच्या वर्षी पडद्यावर येणार आहे.