रणबीर कपूरचे नवे रुप

0

आगामी ‘संजू’ या चित्रपटातील लूकने प्रेक्षकांना थक्क करत असतानाच आता बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रणबीर कपूरला कधी न पाहिलेलं रुप एका नव्या चित्रपटातून भेटीला येत आहे. ‘यशराज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत निर्मिती होणाऱ्या ‘शमशेरा’. या अॅक्शन फिल्ममध्ये तो एका डाकूची भूमिका साकारणार आहे. या वर्षाअखेरीस ‘शमशेरा’च्या शूटिंगला सुरुवात होणार असून २०१९ च्या मध्यापर्यंत ते संपण्याची शक्यता आहे.

‘शमशेरा’चं दिग्दर्शन करण मल्होत्रा करणार आहे. दहा वर्षांच्या करिअरमध्ये रणबीरला नेहमीच एका ‘लव्हर बॉय’च्या भूमिकेत पाहिलं गेलं. मात्र, आता त्या प्रतिमेला शह देत रणबीर डाकूची भूमिका साकारत आहे. ‘यशराज फिल्म्स’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याचा टीझर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. या ४५ सेकंदांच्या टीझरमध्ये हातात कुऱ्हाड आणि बाण घेऊन उभा असलेला एक डाकू म्हणजेच रणबीर आणि त्याच्या मागे जमाव पाहायला मिळत आहे. ‘करम से डकैत, धरम से आजाद’ या टॅगलाइनसह ‘शमशेरा’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.