जिल्ह्यात दुष्काळी योजना तात्काळ लागू कराव्यात

0

जळगांव जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस ची मागणी ; जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

जळगाव- जिल्ह्यात दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत नसल्याने सातत्याने दुष्काळ पडत आहे. राज्य शासनाने दुष्काळ देखील जाहीर केलेला आहे.परंतू काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी दुष्काळी गावांचा दौरा केला असता जिल्ह्यांमध्ये भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत असल्याने जिल्ह्यात तत्काळ दुष्काळी योजना लागू कराव्यात अशी मागण राष्ट्रीय काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन 14 रोजी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,बर्‍याच ठिकाणी महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गुरांना चारा पाण्यासाठी शेतकर्‍यांची दमछाक होत आहे. शेतकरी व सामान्य नागरिकांसाठी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. जिल्ह्यात पाणी व चारा टंचाईचे मोठे संकट उभे असून शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांच्या हातात काही आले नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी व शेती पंपाचे वीज बिल संपूर्ण माफ न मिळाल्याने शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सर्वीकडे दुष्काळ असताना शासनाने खताच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने शेतकर्‍यांचे हाल होत असून जगावे कसे ? असा प्रश्न शेतकरी काँग्रेस पदाधिकार्‍याशी बोलत आहे. दुष्काळाची दाहकता मोठी असल्याचे निवेदनात नमूद आहे. निवेदनावर उदय पाटील,राजेश कोतवाल,अजबराव पाटील,एस.टी.पाटील (जामनेर),ज्ञानेश्वर कोळी,दिपक सोनवणे, राजेंद्र महाजन,योगेश देशमुख, रवींद्र चौधरी, महेंद्रसिंग पाटील आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधिर तांबे, काँग्रेस प्रदेश सरचिटणिस विनायकराव देशमुख, महानगराध्यक्ष डाँ.राधेशाम चौधरी यांची निवेदन देतेवेळी उपस्थिती होती.

दुष्काळामुळे शेतकर्‍यांसह नागरिक मेटाकुटीला
जिल्ह्यात दिनांक 15 ते 20 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा सह केळी पिंकाचे अतोनात नुकसान झाले होते शेतकर्‍यांनी मागणी करूनही नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केले नाहीत जिल्ह्यात अनेक गावात पाण्याची टंचाई असून जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. अमळनेर, धरणगाव, पारोळा, चाळीसगाव, एरंडोल या तालुक्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई आहे.या ठिकाणी पाणी विकत घ्यावे लागत आहे. शेतकरी मेटाकुटीस आला आहे पाण्याअभावी बर्‍याच ठिकाणी बागा सुकल्याने मोठा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ची प्रशासन व राज्य शासन यांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.यावर शासनाने जिल्ह्यात तात्काळ उपाययोजना लागू करून आवश्यक त्या ठिकाणी चारा डेपो ,टँकर मागणी, धरणातून आवर्तन,शेतकरी सम्पूर्ण कर्जमाफी या गोष्टी प्राधान्याने कराव्यात अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.