एक ही भूल, कमल का फूल…!

0

मुंबई – आज देशाच्या तुलनेत मुंबई शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाई कमी करण्याचे खोटे आश्वासन देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांची पार फसवणूक केली आहे. याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून एक अनोखे आंदोलन करण्यात आले.

पंतप्रधान मोदींच्या राज्यात सर्वसामान्य नागरिक मनावर दगड ठेवून महागडे पेट्रोल-डिझेल आपल्या गाडीत भरत आहेत. त्यांच्याप्रती सद्भावना म्हणून त्यांना कमळाचे फूलभेट करत, भाजपच्या फसव्या आश्वासनांची त्यांना आठवण करून देत हे आंदोलन करण्यात आले. युवक प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हण यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.