राष्ट्रवादी कडून ब-हाणपुर-अंकलेश्वर या राज्यमहामार्गावरील धानोरा बसस्थानक परीसरात विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन

भुसावळ प्रतिनिधी दि 23 ब-हाणपुर-अंकलेश्वर या राज्यमहामार्गावरील धानोरा बसस्थानक परीसरात राष्ट्रवादी कडून विविध मागण्यांसाठी ककंरास्ता रोको आंदोलन करण्यात आले यात प्रामुख्याने दोन महीन्यांपूर्वी धानोरा येथे १३२ केव्ही चे सबस्टेशन मंजुर झाले होते. काम सुद्धा सुरु झालेले होते, परंतु विघ्नसंतोषी लोकांनी ठेकेदाराला मारहाण केली. यामुळे संबंधित ठेकेदार हा सर्व सामा घेऊन पळ काढावा लागला. बंद पडलेल्या कामामुळे शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. तसेच कापसाला १२ हजार भाव मिळावा, केळीला जाहीर केलेल्या भावाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहीजे, कमी भावात कापू नये. अडावद येथे कायमस्वरुपी अभियंताची नियुक्ती करावी कांद्याला शासनाने अनुदान दिले पाहीजे. अडावद येथे सबस्टेशन काम सुरु झाले पाहीजे. अशा विविध मागण्यांसाठी दि २३ रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. तरी या आंदोलनात माजी सभापती यांनी सरकारवर व आमदारावर सडकून टिका केली व . विस टक्याच्या कमीशनसाठी जर कामे बंद पडतील काय उपयोग ज्या विघ्नसंतोषी लोकांनी ठेकेदारा मारहान केली त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी माजी सभापती डि. पी. साळूकेसर यांनी केली यावेळी विधान सभेचे माजी अध्यक्ष मा. अरुणभाई गुजराथी चो साका चे माजी चेरअमन अॅड घनश्याम पाटील उपसभापती सुर्यकांत खैरनार माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी – जि.प. चे माजी सदस्य बाळासाहेब पाटील जयसिंग पाटील ( वरगव्हाण) रविद्र पाटील, कैलास पाटील, अनिल महाजन, सुतगीरणी संचालक प्रकाश महाजन, (अडावद ) डॉ सुधाकर पाटील (खर्डी) व परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.