रावेर प्रतिनिधी l
रावेर कृषी उपन्न बाजार समितीच्या सभापती पदी सचिन पाटील यांची तर उपसभापती पदी योगेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.अत्यंत चुरसीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कडून प्रदेश वरुन सभापती पदावर नाव निश्चित झाल्याने एकच चर्चा होती.
रावेर कृषी उपन्न बाजार समितीत राष्ट्रवादी कडून सभापती पदासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली होती.आधी मंदार पाटील व राजेंद्र चौधरी यांच्यात चुरस होती.नंतर मंदार पाटील यांनी राजेंद्र चौधरींसाठी माघार घेतल्याने सभापतीपदासाठी सचिन पाटील व राजेंद्र चौधरी यांच्यात चुरस निर्माण झाली.अखेर चेंडू गटनेते आ एकनाथराव खडसे यांच्याकडे गेला तिथे देखिल सभापती पदावर एकमत न झाल्याने अखेर निर्णय घेण्याची जबाबदारी प्रदेश वर गेली प्रदेश वरुन सचिन पाटील यांचे नाव आल्याने त्यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने सचिन पाटील यांची सभापती तर योगेश पाटील यांची उपसभापती पदी बिनविरोध निवडची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी यांनी जाहिर केले
यावेळी संचालक डॉ राजेंद्र पाटील मनिषा पाटील सुनीता पाटील मंदार पाटील विलास चौधरी रोहीत अग्रवाल राजेंद्र चौधरी प्रल्हाद पाटील योगिराज पाटील पंकज पाटील पितांबर पाटील सैय्यद अजगर जयेश कुयटे सिकंदर तडवी पांडुरंग पाटील आदी विशेष सभेला उपस्थित होते